जालना – राज्यात कोरोना थैमान घालत असून बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा फायदा उठविण्यासाठी खासगी हॉस्पिटल्स बाधितांना उपचारार्थ दाखल करुन घेण्यापूर्वी डिपॉझिट घेत आहेत. हे डिपॉझिट हजारांपासून लाखांपर्यंत असल्याच्या तक्रारी आहेत. याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. खासगी हॉस्पिटल्सनी डिपॉझिट घेतल्यास किंवा त्याची सक्ती केल्यास संबंधित हॉस्पिटल्सवर कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिला आहे.
जालना येथील कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात अनेक हॉस्पिटल संधीसाधूपणा करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे. परिस्थिती गंभीर असली तरी दोषींवर कारवाई केली जाईल, कुणाचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराच डॉ. टोपे यांनी दिला आहे.