नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये तर ३५ हजार ८७१ नवे रुग्ण आढळले असून १७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच उपचाराधीन रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. गेल्या एक महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या ८५ टक्क्यांनी वाढून २ लाख ५२ हजार ३६४ पर्यंत पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार १७ फेब्रुवारीला देशात १ लाख ३६ हजार ५४९ सक्रिय रुग्ण होते. त्यावेळी यात सातत्याने घटही होत होती. मात्र गेल्या एक महिन्यात त्यात वेगाने वाढ झाली. याचाच अर्थ असा की नवे रुग्ण वाढत आहेत आणि बरे होणाऱ्यांची संख्या घटत आहे.
गेल्या चोवीस तासात देशात १७ हजार ९५८ सक्रीय रुग्णांची भर पडली आहे. तर १७ हजार ७४१ रुग्ण बरे झाले. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ६ डिसेंबरनंतर गुरुवारी सर्वाधिक नव्या संक्रमणांची नोंद झाली आहे. आता देशात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १ कोटी १४ लाख ७४ हजार ६०४ एवढी झाली आहे. तर १ लाख ५९ हजार २१६ जणांचा मृत्यू झाला आहे.
७९.५४ टक्के रुग्ण केवळ पाच राज्यांमध्ये
मंत्रालयाने सांगितले आहे की देशातील एकूण नव्या रुग्णांमध्ये ७९.५४ टक्के रुग्ण केवळ पाच राज्यांमधील आहेत. यात महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. एकट्या महाराष्ट्रात ६३.२१ टक्के म्हणजे १६ हजार ६२० नवे रुग्ण आढळले आहेत. तर केरळमध्ये १७९२ आणि पंजाबमध्ये १४९२ रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाच्या नव्या विषाणूने ४०० संक्रमित
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की कोरोनाच्या ब्रिटन, दक्षिण आफ्रिका तसेच ब्राझीलमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूमुळे ४०० लोक आतापर्यंत संक्रमित झाले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण ब्रिटनमध्ये आढळले आहेत.