नाशिक – गेल्या मे-जून महिन्यात नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला. तेव्हापासून आतापर्यंत नाशिक शहरात एक हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, उर्वरीत नाशिक जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या एक हजाराहून अधिक झाली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना मृत्यूंचा आकडा दोन हजारापार गेला आहे.
शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (७ जानेवारी) २३३ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३१७ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ११ हजार ८३९ झाली आहे. १ लाख ८ हजार १३२ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत २ हजार ००४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ७०३ जण उपचार घेत आहेत.
गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १७१, ग्रामीण भागातील ५४, मालेगाव शहरातील ५ तर जिल्ह्याबाहेरील ३ जणांचा समावेश आहे. तर, ७ मृतांमध्ये नाशिक शहरातील ३ आणि ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७३ हजार ४६१. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४६२. पूर्णपणे बरे झालेले – ७१ हजार ४६२. एकूण मृत्यू – ९९३. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १००६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.२८
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३२ हजार ७०७. पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार ३९३. एकूण मृत्यू – ७८७.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ५२७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.९८
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ६३०. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार २९९. एकूण मृत्यू – १७५
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १५६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.८५
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी