नाशिक – नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरीटी प्रेस ५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर असे पाच दिवस दोन्ही प्रेस बंद राहणार आहेत. तशी माहिती आयएसपी मजदूर संघाने दिली आहे. यासंदर्भात संघाने एक प्रसिद्धी पत्रकही जारी केले आहे.
हे पत्रक सर्वांच्या माहितीस्तव