लॉस एंजेलिस – अमेरीकेत पहिल्या टप्प्यातील कोरोना महामारीचे केंद्र असलेल्या कॅलिफोर्नियात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियात नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अमेरिकेत रोज विक्रमी संख्येने वाढ होते आहे. याचेच परिणाम स्वरूप कोरोना बाधितांची संख्या दीड कोटीच्या जवळ पोहचली आहे. तर २ लाख ८२ हजाराहून अधिक पीडितांचा मृत्यू झाला.
कामकाज बंद करण्याचे आदेश
कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हीन न्यूसोम यांनी संक्रमण रोकण्याकरीता तीन आठवड्यांसाठी बंदचे निर्देश काढले आहेत. कोरोना प्रभावित भागात सोमवारपासून बार, सलून, टॅटू शॉप आणि रेस्टरॉसमवेत अनेक प्रतिष्ठाने बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. लोकांनी गर्दी करण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे. मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. नवीन आदेशाने २ कोटी ३० लाख नागरिक प्रभावित झाले आहेत.
टेक्सास मध्ये सर्वाधिक रुग्ण
कॅलिफोर्नियामध्ये रविवारी कोरोनाचे ३० हजाराहून अधिक बाधित आढळून आले. एक दिवस आधी जवळपास २२ हजार रुग्ण आढळून आले होते. कॅलिफोर्नियामध्ये आजवर १३ लाख ७० हजार रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेत कॅलिफोर्नियानंतर टेक्सास मध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या प्रांतात १३ लाख ५० हजार रुग्ण आढळून आले आहेत. फ्लोरिडा मध्ये सुद्धा कोरोना अधितान्चा आकडा १० लाख पार झालेला आहे.
रशियात २८ हजार रुग्ण
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत असलेल्या रशियामध्ये संक्रमण वेगाने वाढत आहे. सोमवारी २४ तासात २८ हजार १४२ बाधित आढळून आले. एक दिवस आधी २९ हजारहून अधिक लोक बाधित आढळून आले होते. यामुळे रशियातील कोरोना रुग्णांची संख्या २४ लाख ८८ हजार झाली आहे. यापैकी ४३ हजार ५९७ पीडितांचा मृत्यू झालेला आहे.