मुंबई – राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट या चित्रकला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे दहावीच्या आणि विविध सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या शैक्षणिक वर्षात या परीक्षांचे अतिरीक्त गुण मिळणार नाहीत. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात कला शिक्षण प्रशिक्षण पदविका (एटीडी) आणि मूलभूत अभ्यासक्रम (फाऊंडेशन)ला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीतून सूट देण्यात आली आहे.