नाशिक – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मोठा निर्णय घेतला आहे. त्र्यंबकेश्वर शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आगामी सात दिवस त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवले जाणार आहे. मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन देवस्थान प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. उद्यापासून ७ दिवस मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. नियमित पूजा-अर्चा मात्र पुरोहितांद्वारे होणार आहेत. अशा प्रकारे ७ दिवस सलग मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे.