मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कोरोना : निसर्गोपचाराचे वरदान

by Gautam Sancheti
ऑगस्ट 2, 2020 | 10:08 am
in इतर
0
download

कोरोनामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. मात्र, प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी निसर्गोपचार अतिशय महत्त्वाचा ठरत आहे. त्याकडे अद्याप आपण फारसे लक्ष दिलेले नाही. या पर्यायाचा हा ऊहापोह.

प्रदीप शेटे

अलीकडील एक चर्चिला जाणारा गंभीर व भीतीदायक विषय म्हणजे ‘कोरोना’ हा सांसर्गिक आजार होय. बातम्या पाहताना, वर्तमानपत्र वाचताना तसेच व्हाॅट्सअॅप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर त्याचे अस्तित्त्व आपणास जाणवत राहते. जागतिक आरोग्य संघटना (WHO) व आयुष (AYUSH ) मंत्रालय वेळोवेळी लोकहितास्तव कोरोनाबाबत सूचना जारी करत असतात.  मग त्या मास्क वापरण्याबाबत, वारंवार साबणाने हात धुण्याबाबत असो किंवा सोशल डिस्टन्सिंगबाबत असो. एकंदरीत काय तर घराघरांत भीतीदायक वातावरण आहे.

हा लेख लिहितांना जगामध्ये १ कोटी ७२ लाख व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या आहेत. त्यापैकी साधारण ६.५ लाख व्यक्ती मृत पावल्या आहेत, तर १ कोटी २ लाख व्यक्ती या पूर्णपणे ब-या झालेले आहेत. म्हणजे साधारण ४ टक्के व्यक्ती यात मृत पावल्या आहेत. भारताबाबत बोलायचे झाल्यास समूह संसर्ग (community spread) हे सुरू झालेले आहे. एकूण १५ लाखांवर लोक कोरोनाबाधित आहेत त्यापैकी ९ लाख ७० हजार व्यक्ती पूर्णपणे ब-या झालेल्या आहेत तर ३३ हजारांपेक्षा जास्त व्यक्ती यात मृत पावलेल्या आहेत. साधारण मृत्यूदर ३ टक्के आहे. एव्हाना सर्व वाचकांना कोरोना कशामुळे होतो, त्याची काय लक्षणे दिसतात याबाबत विविध माध्यमातून माहिती मिळाली आहे. या सर्व गोष्टींची चर्चा करण्यापेक्षा निसर्गोपचाराच्या सहाय्याने आपण स्वतःची रोगप्रतिकारशक्ती वाढवून कोरोनाला दोन हात लांब कसे ठेवू शकतो ते पाहू या.

सर्व प्रथम आयुष मंत्रालयाने काही खबरदारीचा उपाय म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही सल्ले दिलेली आहेत ते आपण पाहू या:

  • होमिओपॅथी: आर्सेनिक अल्बम ३० ( Arsenicum Album ३०) सकाळी उपाशीपोटी सलग तीन दिवस रोज एक डोस. जोपर्यंत कोरोनाचे प्रादुर्भाव आहे तोपर्यंत हा डोस दरमहिन्याला एकदा घेण्याचा सल्ला दिलेला आहे. हा डोस वाचकांनी होमिओपॅथी डॉक्टरांकडून घेतल्यास ते विश्वसनीय औषध असेल.
  • आयुर्वेद :
    • रोज सकाळी च्यवनप्राश १० mg ( १ चहाचा चमचा). मधुमेही रुग्णांनी शुगर फ्री च्यवनप्राश घ्यावे.
    • हरबल चहा/ काढा : तुळशी, दालचिनी, मिरी, आलं / सुंठ, मनुके यांचा चहा किंवा काढा दिवसातून एक ते दोन वेळा घेणे. जर पित्ताचा ( Acidity) त्रास झाल्यास ते कमी उकळणे. तरी पित्ताचा त्रास झाल्यास घेऊ नये.
    • सुवर्ण दूध : हळद अर्धा चहाचा चमचा १५० ml गरम दुधात घालून दिवसातून १ ते २ वेळा पिणे.
    • भाज्या शिजवतांना हळद, जिरे, कोथिंबीर, लसूण यांचा वापर करणे.

निसर्गोपचार व रोगप्रतिकारशक्ती :

आता निसर्गोपचाराने रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवायची ते आपण पाहू या.   निसर्गोपचार ही एक प्राचीन उपचारपद्धती आहे. या उपचारपद्धतीमध्ये औषधांचा वापर न करता निसर्गात असलेल्या घटकांचा सुसंगत व तर्कसंगत वापर करून रोगाचे मूळ कारण दूर करून रोगनिवारण केले जाते. याचा प्राचीन ग्रंथात व वेदात उल्लेख सापडतो. आजच्या सुपरफास्ट जगात व्यक्तीस ही उपचारपद्धती व्यक्तीस वेळखाऊ व निरुपयोगी वाटते. प्रत्येकास ‘पी हळद व हो गोरी’ या उक्तीप्रमाणे झटपट व फास्ट परिणाम देणा-या उपचारपद्धती हव्या असतात.

आपण तोंडावाटे अन्न व पाणी ग्रहण करतो, तसेच श्वसनावाटे हवा आत घेतो. अन्नाचे व पाण्याचे चयापचय होऊन त्यातून शरीरास लागणारे पाणी, जीवनसत्त्वे, खनिजे, ग्लुकोज व इतर पौष्टिक रसायने शरीरास मिळतात. या चयापचयाच्या क्रियेमध्ये बरेचसे टाकाऊ पदार्थ तयार होतात ज्याची शरीरास गरज नसते व असे पदार्थ म्हणजेच विजातीय पदार्थ (विषद्रव्य), हे शरीराबाहेर टाकण्याचे गरजेचे असते. हे विजातीय घटक मल व मूत्राद्वारे शरीराबाहेर टाकण्याचे कार्य शरीरातील वेगवेगळे अवयव करत असतात. तसेच काही विषद्रव्ये हे घामावाटे शरीराबाहेर काढण्याचे कामदेखील होत असते. तसेच शरीरास कार्य करण्यास शुद्ध ऑक्सिजन वायूची गरज असते. श्वसनावाटे आपण हवा आत घेतो, फुफ्फुसामध्ये यातील ऑक्सिजन घेऊन कार्बनडाय ऑक्साइड सोडले जाते. तसेच प्रदूषणामुळे नको असलेले घटक उदा. कार्बनकण व काही घातक वायू  या प्रक्रियेमध्ये  फुफ्फुसात येतात. ते शरीराबाहेर टाकण्याचे गरजेचे असते.  तर अशा टाकाऊ पदार्थांना शरीराबाहेर टाकण्याचे कार्य जेव्हा नीट होत नाही तेव्हा त्याचा शरीरात प्रमाणाबाहेर संचय होतो. ते विषाचे कार्य करू लागते. परिणामी व्यक्ती आजारी पडते.

निसर्गोपचाराच्या या तत्त्वानुसार ज्या वक्तीमध्ये विषद्रव्ये कमी प्रमाणात आहे त्यांची संरक्षक प्रणाली ही शरीरात येणाऱ्या सर्व जंतूंचा नाश करते. मग ते हवे मार्फत, पाण्यामार्फत किंवा अन्नामार्फत येवो. यामुळे अशा व्यक्ती अशा स्थितीतही निरोगी राहतात. याउलट ज्या शरीरामध्ये विषद्रव्यांचा साठा हा अतिरिक्त असतो अशा शरीरामध्ये जंतूंचे पोषण व झपाट्याने वाढ होते. त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते म्हणून व्यक्ती आजारी पडते.

थोडक्यात निसर्गोपचाराच्या तत्त्वानुसार आजार हे जंतूने होत नाही. हे वाचण्यास थोडेसे विचित्र वाटेल. टायपिंग चूक झाले असावे असे वाटेल. नाही ! हे तुम्ही बरोबर वाचताय. सध्याच्या कोरोना या साथीच्या आजारात तुम्ही काही बातम्या वाचल्या असाल की काही लोकांच्या टेस्ट केल्यावर त्यांच्या शरीरात अँटीबॉडी आढळून आले.  याचा अर्थ त्यांना कोरोना हा आजार होऊन गेला व ते त्यातून १०० टक्के बरेदेखील झाले आहेत, पण हे त्यांना माहीत नाही. हा त्यातील एक प्रकार आहे.

आता आपण थोडक्यात आहार व निसर्गोपचाराच्या काही क्रिया पाहू या ज्या आपणास रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतील.

  1. आहार :
  • गुळवेलच्या खोडाचा काढा किंवा गुळवेलच्या पानाचे सेवन रोज सकाळी उपाशीपोटी (पाणी पिल्यानंतर) केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • दिवसाची सुरुवात हंगामी (seasonal) फळाने करावे. जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत खाण्याची वेळ झाली म्हणून खाऊ नये. शरीराची भाषा ऐका. निसर्गाने शरीराची व त्यांतील प्रणालीची रचना फार सुरेख केली आहे. सर्व प्रणालीमध्ये feedback system आहे व ते तुम्हास सांगत असतात. तसेच भूक लागल्यावर भुकेची भावना होते. जर भूक लागलेली समजत नसेल तर, दिवसाची सुरुवात फळाने करणे तसेच दिवसातून फक्त दोन वेळा जेवणे. या व्यतिरिक्त फक्त पाणी अथवा लिंबू पाणी पिणे यामुळे चयापचयाची क्रिया सुधारून सर्वसाधारण रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
  • व्हिटॅमिन ‘सी’: आहारात व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण वाढवावे. आवळा, लिंबू , मोसंबी, संत्रा, टोमॅटो, किवी, स्ट्राॅबेरी या फळांमध्ये, फळभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण मुबलक आहे.  या सर्वांमध्ये सर्वात स्वस्त व अधिक प्रमाण उपलब्ध म्हणजे लिंबू होय. दिवसातून ३ ते ४ वेळा लिंबू पाण्याचे सेवन आपण करू शकता. तसेच लहान मुलांना साखर घालून लिंबू सरबत देऊ शकता.
  • व्हिटॅमिन ‘डी’ : सुदैवाने भारतात सूर्यप्रकाश हा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. रोज सकाळी २० मिनिटे सूर्यप्रकाश शरीरावर घेतल्यास शरीरात व्हिटॅमिन ‘डी’ ची निर्मिती होते व शरीराची गरज भासते. या व्यतिरिक्त साल्मोन माशाचे तेल व अंडी हेदेखील व्हिटॅमिन ‘डी’ चे चांगले स्राेत आहेत.
  1. नाकाद्वारे उपचार : यामुळे नाक व सायनसची पोकळीपर्यंतचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते.
  • प्रतिमर्श नस्य :  दोन्ही नाकपुड्यांमध्ये सकाळी व संध्याकाळी बोटांनी तिळाचे तेल, खोबरेल तेल किंवा तूप लावावे.
  • जलनेती : जलनेतीमुळे नाकाद्वारे होणारा संसर्ग कमी होण्यास मदत होते. हलके कोमट पाण्यात थोडेसे मीठ टाका. ते जलनेती पात्रात घ्या. मान तिरकी करून एका नाकपुडीतून जल आत सोडून दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर येऊ द्या. हा प्रकार करताना नाक साफ असावे  व  श्वसनक्रिया तोंडानी करावी. हे येत नसेल तर योग तज्ज्ञांकडून शिकून घेणे गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने केल्यास पाणी सायनसच्या पोकळीत जाऊन जोरात ठसका अथवा झटका बसून डोक्यात झिणझिण्या येऊ शकतात. हा प्रकार दिवसातून किमान दोन वेळा करणे.
  1. मुखाद्वारे उपचार :
  • तेल घोळवणे ( Oil Pulling ) :  यामध्ये तोंडामध्ये खोबरेल तेल अथवा तिळाचे तेल घेऊन ते पाच मिनिटांपर्यंत घोळवणे व नंतर थुंकून देणे. हे तेल प्यायचे नाही. चुकून पिले गेल्यास नुकसान नाही.
  • गरम पाण्याच्या गुळण्या : घसा निरोगी ठेवण्यासाठी सोसवेल इतक्या मिठाच्या गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. हे दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी व संध्याकाळी करावे. घसा खवखवत असेल किंवा कोरडा खोकला असेल तर लवंग व खडीसाखरची मिक्सरमध्ये पावडर करून त्याचे दिवसातून  दोन ते तीन वेळा सेवन करावे.
  • वाफ घेणे : नाकाने वाफ घेतल्याने, नाकापासून सायनस कॅव्हिटीपर्यंतचे आरोग्य सुधारते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या सूचनांचे सर्वांनी योग्य पालन करावे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे व विनाकारण खरेदीसाठी बाहेर पडू नये. काहीजण म्हणतील भाज्या, फळभाज्या व फळे याशिवाय आहाराचे कसे होणार?  अशावेळी आहारात पुढील गोष्टींचा समावेश करावा.

  • मोड आलेली कडधान्ये : कडधान्ये हे बरेच दिवस साठवता येते. मोड आलेल्या कडधान्यात व्हिटॅमिन अ, ब, क व इ चे प्रमाण मुबलक असते. यामध्ये प्रोटीनची मात्रादेखील चांगली असते. त्यामुळे ते शरीरास पौष्टिक आहे. तसेच यामध्ये नैसर्गिक तंतूंचे प्रमाण अधिक असल्यामुळे पचनक्रिया सुलभ होण्यास मदत होते.
  • धिरडं, थालीपीठ : वेगवेगळ्या धान्याचे पिठ हे प्रत्येक घरात असते. नसतील तर त्या धान्याचे मिक्सरमध्ये बारीक करून पीठ बनवता येईल. त्या सगळ्या पिठाचे एकत्रितपणे केलेले धिरडे, थालीपीठ हादेखील एक पौष्टिक आहार आहे.  यामध्ये कांदादेखील घालता येईल.
  • दुग्धजन्य पदार्थ : सायीचे विरजण लावून त्यापासून मिळणारे लोणी व ताक हे आरोग्यदायी आहेत. दही व ताक हे pro-biotic असल्यामुळे अन्न पचण्यास उत्कृष्ट.
  • पातळ भाजी : भाज्यांचा तुटवडा असल्यामुळे विविध डाळींची आमटी.  तसेच बदल म्हणून त्यात एखादा बटाटा वापरून बनवलेल्या पातळ भाजीचे सेवन. शेंगदाण्याची आमटी.
  • गुळाचे सेवन : कधी कधी वरील भाज्यांचा कंटाळा आल्यास पोळीबरोबर, भाकरीबरोबर गुळाचे सेवन हे आरोग्यदायी आहे.
  • संपूर्ण वेळ घरात असल्यामुळे बऱ्याच जणांना विनाकारण भूक लागल्यासारखे वाटण्याची शक्यता आहे व अतिरिक्त खाण्याने चयापचयाची क्रिया बिघडून पोट बिघडण्याची शक्यता असते. म्हणून पचनक्रिया ठीक राहण्यासाठी पोटभर न जेवता मितआहार घ्यावा. जेवण्याच्या वेळा कमीत कमी असाव्यात
  • घरातल्या घरात पुढील व्यायाम करावे :- सूर्यनमस्कार, घरच्याघरी चालणे, कपालभाती (सराव असेल तर), अनुलोम विलोम प्राणायाम. ज्यांना जिमच्या व्यायामाची सवय असेल त्यांनी स्वतःचे वजन वापरून, तसेच बाटलीत पाणी भरून वजनाचे व्यायाम करावे.

या झाल्या सर्वसाधारण घरच्या घरी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी छोट्या टिप्स. जर आपणास ताप, खोकला, स्नायूदुखी, थकवा व श्वसनास त्रास होत असेल तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा, जेणेकरून कोरोनावर पुढील योग्य उपचार घेण्यासाठी आपले डॉक्टर आपणास मार्गदर्शन करतील.

(लेखक हे योगा व नॅचरोपॅथिस्ट आहेत. त्यांचा व्हाॅट्सअॅप क्रमांक : ९४२३५५३९९८)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चांदेश्वरी धबधब्याखाली बुडून तरुणाचा मृत्यू

Next Post

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
ami shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाचा योग, जाणून घ्या, मंगळवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 4, 2025
WhatsApp Image 2025 08 04 at 1.51.07 PM 1920x865 1 e1754317916454

मुख्यमंत्र्यांकडून वॉररुमध्ये ३० प्रकल्पांचा आढावा…दिले हे निर्देश

ऑगस्ट 4, 2025
anjali damaniya

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद गेल्यानंतरही शासकीय बंगला ५ महिने खाली केला नाही…अंजली दमानिया यांनी केली ही टीका

ऑगस्ट 4, 2025
Untitled 4

भारतीय संघाने इंग्लंड विरुध्दच्या अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी मिळवला थरारक विजय

ऑगस्ट 4, 2025
accident 11

धावत्या रिक्षातून पडल्याने ५८ वर्षीय प्रवासी गंभीर जखमी…चालकाच्या हलगर्जीपणामुळे घटना, गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील ३,५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची मदत

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011