नाशिक – कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांना आता जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पण, आरोग्य चक्र आणि अर्थ चक्र सुरू राहण्यासाठी पूर्ण लॉक डाऊन न करता काही बंधने घालून आस्थापना सुरू ठेवण्याचे निर्देश अगोदरच दिले आहे. त्यांना गर्दी नियंत्रण पाळण्याचे बंधन आहे. पण, त्याचे उल्लंघन होत असल्यामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रांत, तहसीलदार यांना हे आदेश दिले आहेत.
……
प्रति
सर्व प्रांत अधिकारी/तहसीलदार
नाशिक ग्रामीण जिल्हा.
आरोग्य चक्र आणि अर्थ चक्र सुरू राहण्यासाठी आपण पूर्ण लॉक डाऊन न करता काही बंधने घालून आस्थापना सुरू ठेवल्या आहे. परंतु आपल्या अधिसूचनेनुसार सर्वच आस्थापना वर आधीपासूनच गर्दी नियंत्रण पाळण्याचे बंधन आहे. त्यांनी उल्लंघन केल्यास कोणत्याही आस्थापना बंद करण्याचे अधिकार प्रांत/ तहसीलदार यांना आहेत.
त्या तरतुदीचा वापर करून काल मालेगावमधील एक थिएटर सील करण्यात आले. गर्दी नियंत्रणासाठी कायद्याची जितकी कडक अंमलबजावणी आपल्या स्तरावरून होईल तितक्या नागरिकांना आपण भविष्यातील संसर्गापासून वाचवू शकू. आपण किती आस्थापना वर या प्रमाणे कारवाई केली याची माहिती दैनंदिन अहवालात सामील करावी व EOC ला एक प्रत पाठवावी. पूर्ण लॉक डाऊन टाळण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे व ही सूचना जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापनांना सुद्धा लागू आहे कारण जीवनावश्यक ठिकाणीसुद्धा गर्दी करणे अपेक्षित नाही. सोबत नागरिकांचा प्रतिसाद मिळण्याच्या दृष्टीने प्रबोधनही सुरू ठेवावे. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, स्थानिक जागरूक नागरिक इत्यादींची मदत घ्यावी.
सूरज मांढरे
जिल्हाधिकारी नाशिक