नाशिक – शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून गेल्या २४ तासात तब्बल ६ हजाराहून अधिक नवे बाधित झाले आहेत. याची गंभीर दखल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतली आहे. कठोर निर्बंध लादूनही कोरोना बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने आता यापुढे थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
—-
कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार दिसून आले तर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत यापुढे फौजदारी कारवाई संबंधितांविरुद्ध करणेत येईल. या कठीण प्रसंगी सर्व व्यावसायिकांनी नागरिकांच्या हितार्थ काम करणे आवश्यक असल्याचेही आवाहन आहे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक