मंगळवार, ऑगस्ट 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कोरोना नियमांचे उल्लंघन; अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलला नोटीस

by Gautam Sancheti
एप्रिल 8, 2021 | 2:09 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210408 WA0018

नाशिक – कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन होत नसल्याने अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलला महापालिकेने नोटीस बजावण्यात आली आहे. तशी माहिती अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी दिली आहे. महापालिकेच्या पथकाने हॉस्पिटलला अचानक भेट देऊन पाहणी केली.
आतिरीक्त आयुक्त खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मोठ्या मोठ्या रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. तसेच सदरच्या मोठ्या रुग्णालयात मनपाच्या ८० टक्के आरक्षित जागेवर स्वतःचे पेशंट कोणतीही पूर्वसूचना न देता भरती करीत आहेत. एकूण सर्व उपलब्ध बेडची माहिती लपवत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा अत्यंत हलाखीच्या कोविड-१९ च्या परिस्थितीमध्ये सर्व प्रकारचे बेड त्या त्या रुग्णांना वेळेत उपलब्ध होण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी सर्व मोठ्या रुग्णालयांची तपासणी करण्याचे निश्चित केले आहे.
शहरातील खाजगी हॉस्पिटलची पाहणी करून कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन केले जाते की नाही याबाबत पडताळणी मनपाच्या पथकाकडून केली जात आहे. या अनुषंगाने वडाळा रोड येथील अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल येथे मा.अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे व मा.सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांच्या पथकाने पाहणी केली.
याठिकाणी मनपाच्या सी बी आर एस सिस्टिम मध्ये कोविड रुग्णांची माहिती अपडेट केली जात नसून त्यामध्ये बरीच तफावत असल्याचे आढळून आले आहे. नाशिक मनपाच्या रिझर्व्ह बेड प्रमाणे कोविड रुग्णाची भरती मनपाच्या सी बी आर एस सिस्टिम वरून देण्यात येणाऱ्या टोकन प्रमाणे होत नसल्याचेही निदर्शनास येत आहे. रुग्णाच्या बिलावर ऑडिटरचा शेरा सही शिक्का नाही, तशी नोंद असलेली नस्ती मिळून आली नाही.
नाशिक मनपाच्या बिलाबाबतचा फलक हा रुग्णालयात दर्शनी भागात न लावता चुकीच्या जागी लावण्यात आलेला आहे. कोरोना रुग्ण दाखल करतेवेळी वैयक्तिक संरक्षक साधने सँनिटायझर, सोशल डिस्टंसिंग पाळले जात नसल्याचे आढळून आले. तसेच रुग्णालयात एकूण  २११ खाटांवर रुग्ण दाखल होते. त्यामध्ये कोविडचे १५४ रुग्ण व नॉन कोविडचे  ५७ रुग्ण दाखल होते.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रुग्णालयातील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा म्हणजे १८० खाटा कोविड रुग्णासाठी आरक्षित करण्यात याव्यात. तसेच या रुग्णालयात दाखल होणाऱ्या ८० टक्के कोविड रुग्णांची देयके आकारणी (बिल) शासनाच्या नियमानुसार घेण्यात यावी व त्याबाबत मनपास स्पष्टीकरण देण्याबाबत कळविण्यात आले आहे.

IMG 20210408 WA0019 1

    तसेच मनपाच्या सी बी आर एस सिस्टीम वर नोंद होवून टोकन जनरेट झाल्या शिवाय मनपाच्या ८० टक्के आरक्षित बेडवर कोणताही रुग्ण दाखल करण्यात येऊ नये, तसेच सी सी बी आर एस सिस्टिम वर नोंद झाल्यानंतर सदर रुग्ण रुग्णालयात दाखल झालेला आहे, असे समजण्यात येईल असे या नोटीस द्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. यावरील त्रुटींबाबत आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ आणि शासनाच्या प्रत्येक प्रचलित नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे. तरी सर्व खाजगी रुग्णालयानी कोरोना बाबतचे व शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन मनपाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी केले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घोटी – बिबट्याच्या अवयवाची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडणारे गोरक्षनाथ जाधव यांचे निधन 

Next Post

मनमाड – समर्पण ग्रुपतर्फे ऑक्सिजनची सेवा सुरू, सहा मशीन सेवेमध्ये

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

img 4
संमिश्र वार्ता

वसई मधील ‘बविआ’च्या माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये….जळगाव जिल्हयातील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश

ऑगस्ट 26, 2025
cbi
राष्ट्रीय

सीबीआयने एक लाख रुपयांची लाच घेतांना हेड कॉन्स्टेबलला केली अटक

ऑगस्ट 26, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज झाले हे मह्त्वपूर्ण निर्णय

ऑगस्ट 26, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

आझाद मैदान आंदोलन…उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना दिले हे निर्देश….

ऑगस्ट 26, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागातील तीन ठिकाणी घरफोडी…सव्वा चार लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी मारला डल्ला

ऑगस्ट 26, 2025
ladki bahin yojana e1727116118586
संमिश्र वार्ता

लाडकी बहिण योजनेतल्या २६ लाख लाभार्थ्यांची छाननी होणार…

ऑगस्ट 26, 2025
WhatsApp 1
मुख्य बातमी

आपलं सरकार पोर्टलमधील १००१ सेवांचा लाभ घरबसल्या व्हॅाटसअ‍ॅपवर मिळणार…

ऑगस्ट 26, 2025
ed
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत ११७ कोटीच्या फसवणूक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत हिरे, सोने व कार केली जप्त

ऑगस्ट 26, 2025
Next Post
IMG 20210408 WA0023 e1617891066367

मनमाड - समर्पण ग्रुपतर्फे ऑक्सिजनची सेवा सुरू, सहा मशीन सेवेमध्ये

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011