नाशिक – कोरोना संकटावर मात करण्यासाठी जनजागृतीसाठी अहमदनगरच्या लायनेस क्लबतर्फे चित्रस्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यात भारतीय आदिवासी कलेद्वारे प्रबोधन करण्याचे आवाहन करण्यात आले. स्पर्धेतील खुल्या गटात नाशिकच्या कलाकार महिलांनी बाजी मारली. आदिवासी वारली चित्रशैली मार्गदर्शक संजय देवधर यांच्या ५ विद्यार्थिनींनी पारितोषिके पटकावली.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने या ऑनलाईन चित्रस्पर्धेचे आयोजन लायनेस प्रांत ३२३४ डी २ तर्फे करण्यात आले. दोन गटांमध्ये झालेल्या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. खुल्या गटात प्रथम – रोहिणी बिचवे (नाशिक), द्वितीय- ऍड.अपूर्वा भंडारे (नाशिक), तृतीय- बीना केळकर ( मिरज) व श्वेता शाह, चतुर्थ – विद्या शुक्ल (नाशिक),पाचवे – सोनाली केळकर (नाशिक) यांनी पारितोषिके पटकावली.
प्रविण सारगे व आयुष पारिक यांना उत्तेजनार्थ पारितोषिक घोषित करण्यात आले. लायनेस सदस्यांच्या गटात प्रथम – मनीषा अग्रवाल (मनमाड), द्वितीय- अर्चना जगताप, तृतीय – रेवती मिंध्रे (पुणे) व किरण डागा ( कोपरगाव), चतुर्थ – कविता कातकाडे आणि नीतू अहिरराव ( मनमाड), पाचवे – शोभा लवांदे ( शिर्डी ), उत्तेजनार्थ – गीतांजली बागडी (पुणे), सोनिया अग्रवाल व रेखा पाईक ( मनमाड) यांना पारितोषिके जाहीर करण्यात आली.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाशिक्षक दीपक गोंधळे यांनी चित्रपरीक्षण केले. दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांचे संयोजिका व प्रांताध्यक्षा साधना पाटील, प्रांतसचिव कविता पटेकर, प्रांतखजिनदार वैशाली वाणी यांनी अभिनंदन केले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी नीलम परदेशी व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. लवकरच सर्व विजेत्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र पाठवण्यात येणार आहे.
फोटो कॅप्शन – रोहिणी बिचवे यांचे प्रथम पारितोषिक विजेते चित्र