नाशिक – येथील केटरिंग असोसिएशनतर्फे महात्मा गांधी जयंती निमित्त डोंगरेवस्ती गृह मैदान येथे कोरोनाकाळातील सुरक्षेसंबंधी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. सकाळी ११ वाजेपासून डोंगरेवस्ती गृह मैदानाच्या परिसरात मोहीम राबवण्यात आली. यावेळी गरजूंना मास्क वापर करण्यात आले. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांना अनोख्या शैलीत फुल देऊन समज देण्यात आली. यावेळी पोस्टर आणि होर्डिंगद्वारे त्यांनी सुरक्षेसंबंधी जनजागृती केली. लॉकडाउनच्या काळात केटरिंग असोसिएशनतर्फे पोलीस कर्मचारी, सफाई कामगार व अन्य कोरोना योध्यांसाठी भोजनाची सोया केली होती. केटरिंग असोसिएशन नेहमीची सामाजिक कार्यात सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. यावेळी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. केटरिंग केटरिंग असोसिएशनचे संचालक यावेळी उपस्थित होते.