न्यूयॉर्क – जगभरात कोरोना-संक्रमित रूग्णांची संख्या सुमारे १० कोटींपर्यंत गेली आहे. तर या साथीने आतापर्यंत २१ लाख जणांचा बळी घेतला आहे.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्राच्या मते, या संसर्गजन्य रोगाचा अमेरिकेत सर्वाधिक परिणाम झाला आहे. येथे आतापर्यंत चार लाख २३ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे, तर १ कोटीहून अधिक लोक संक्रमित आहेत.
अडीच महिन्यांत संख्या दुप्पट :
अमेरिकेत ८ नोव्हेंबरला रूग्णांची संख्या ५० लाख होती आणि अवघ्या अडीच महिन्यांत ती दुपटीने वाढली, यावरून या साथीच्या वाढीचा अंदाज येऊ शकतो. रशिया, ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, इटली, तुर्की, जर्मनी आणि कोलंबिया आदि देशांमध्ये २ लाखांहून अधिक लोक संक्रमित आहेत.
बायडेन प्रशासनाचा निर्णय :
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी २ कोटी अतिरिक्त लस खरेदी करण्याची घोषणा केली. देशात संसर्गाची प्रकरणे २५ लाखांपर्यंत पोहोचली आहेत. सध्या लस पुरवठा व उत्पादन योजनांचा आढावा घेतल्यानंतर बायडेन प्रशासन राज्य व इतर भागातील साप्ताहिक लसीचा पुरवठा ८६ लाखांवरून वाढवून किमान एक कोटी करणार आहे.
एका स्वयंसेवकचा मृत्यू:
चायना सिनोफर्म ग्रुप कंपनी लिमिटेडने तयार केलेल्या कोरोना लसीच्या चाचणी दरम्यान पेरूच्या एका स्वयंसेवकचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र ओमेगा ३ लसने कोरोना संसर्गामुळे मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो, असे नवीन अभ्यासानुसार आढळले आहे.
फ्रान्समध्ये कहर :
फ्रान्समध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतोच आहे. देशात एका दिवसात तब्बल ६१२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २२ हजार ८०६ जण बाधित झाले आहेत.
अन्य देशांची स्थिती
म्यानमारमध्ये लसीकरण सुरू झाले आहे. २ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच रशियामध्ये संक्रमित रूग्णांची संख्या १ हजारांच्या खाली राहिली आहे. दक्षिण कोरियात गेल्या चोवीस तासांत ९० नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या १० दिवसांत ही सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे.