शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कोरोना काळात झेडपीत मिळाली १२० जणांना नोकरी….

by India Darpan
ऑगस्ट 27, 2020 | 11:13 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200827 WA0197

नाशिक – जिल्हा परिषदेच्या वतीने अनुकंपा अंतर्गत १२० अनुकंपाधारकांना समक्ष बोलावून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या परिचर, आरोग्य सहाय्यक, स्थापत्य अभियंता, शिक्षण सेवक, मुख्य सेविका, पशुधन पर्यवेक्षक या रिक्त पदांवर सर्व उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यात पारदर्शक पध्दतीने मोठया प्रमाणात  कर्मचा-यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आल्याने कर्मचा-यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना काळात झालेली ही भर्ती चर्चेचा विषय सुध्दा ठरली.

अनुकंपा अंतर्गत ११८ उमेदवारांना समुपदेशनाने नियुक्ती देण्यात आली आहे. यामध्ये परिचर पदावर ४६, ग्रामसेवक पदावर १९, शिक्षण सेवक पदावर १२, पर्यवेक्षिका पदावर १, आरोग्य सेवक पदावर २८, आरोग्य सेविका १, प्रयोग शाळा तंत्रज्ञ १, पशुधन पर्यवेक्षक २, स्थापत्य अभियंता सहाय्यक ५, कनिष्ठ अभियंता २ व विस्तार अधिकारी कृषी १ अशा ११८ जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी वेळोवेळी कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत सर्व विभागांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेत गेल्या तीन महिन्यात मोठया संख्येने कर्मचा-यांचे प्रश्न निकाली काढण्यात आले आहेत. विविध विभागातील कर्मचा-यांची पदोन्नती, दहा, वीस व तीस वर्ष सेवा झालेल्या कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, अनुकंपा अंतर्गत नियुक्ती आदि कर्मचा-यांच्या जिव्हाळयाचे प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. अनुकंपा अंतर्गत नियुक्ती करणेसाठी सामान्य प्रशासन विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी रणजित पगारे, निवृत्ती बगड, मंगेश केदार किशोर पवार, आरोग्य विभागाचे प्रकाश थेटे, पंडितराव कटारे आदिंनी परिश्रम घेतले. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सामान्य प्रशासन विभागात जावून याकामी गेल्या आठवडयापासून परिश्रम घेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत ६९ परिचरांच्या विनंतीने बदल्या करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! संरक्षण मंत्रालयाने घेतला हा निर्णय

Next Post

सिन्नर येथील ६६ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू

Next Post

सिन्नर येथील ६६ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
IMG 20250102 WA0190 1

चुकीला माफी नाही…नाशिकच्या झेडपीच्या सीईओ मित्तल यांची गैरप्रकार करणा-यांविरोधात कणखर भूमिका

जून 21, 2025
crime1

ऑनलाईन फुकटच्या कर्जाचे आमिष दाखवून दोघांनी पेंटरला दीड लाखाला घातला गंडा…

जून 21, 2025
rape

तरूणीवर बळजबरीने बलात्कार…नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 21, 2025
IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011