कोरोना काळात शहराप्रमाणेच ग्रामीण भागात शाळा बंद असल्यामुळे सुरुवातीला विद्यार्थी हतबल झाले. त्यांच्या शैक्षणिक बाबतीत अनेक अडचणी निर्माण झाल्या, पण, याच काळात नाशिक मधील नामांकित असलेल्या गब्रीएल इंडिया लिमिटेड, आनंद आइ पावर, हल्डेक्स इंडिया लिमिटेड या सारख्या कंपन्यांनी आपल्या सीएसआर फ़ंडाच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या एस. एन. एस. फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या प्रोजेक्टच्या सहाय्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावातील समाजमंदिर, मोकळ्या जागा व शाळेच्या वरवंडयात मुलांना ज्ञानदानाचे काम सुरु केले. लॅाकडाउन काळातही सुरक्षित अंतर ठेवत…सामाजिक बांधिलकी जपत गावाच्या, समाजाच्या परवानणीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. हे काम त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिलें, काशीदपाडा, वेळुंजे, खरशेत, सादडपाना, जांभूळपाडा या गावात त्यांच्या शिक्षकांनी सुरु केले. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले नाही. सावरपाडा आणि पांगुळघर या गावातील लोकांनी या शिक्षकांना त्यांच्याही गावात या शिकवणी वर्ग चालू करण्याची विनंती केली, आज या ठिकाणी सुध्दा हे शिकवणी वर्ग चालू आहेत .आज ज्या ठिकाणी हे वर्ग चालु आहेत त्या व इतरही ठिकाणचे सामाजातील लोक या उपक्रमा बद्दल आनंद व्यक्त करत आहेत.असा हा उपक्रम पुढेही चालू ठेवावा अशा सूचनाही करत आहेत….कोरोना काळात शैक्षणिक क्षेत्रात काम करणा-या या शिक्षकांचे काम भूषणावह असेच आहे….