नाशिक – कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. सद्यस्थितीत उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये घट होतांना दिसत आहे. विभागातून आजपर्यंत 2 लाख 53 हजार 369 रुग्णांपैकी 2 लाख 44 हजार 151 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 4 हजार 401 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात 4 हजार 817 रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.36 आहे, तर मृत्युदर 1.90 टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी. गांडाळ यांनी दिली आहे.
नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 10 लाख 60 हजार 883 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 2 लाख 53 हजार 369 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच विभागात 6 हजार 136 व्यक्ति होम क्वारंटाईन तर 385 व्यक्ति संस्थात्मक क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी.गांडाळ यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातून आजपर्यंत 1 लाख 3 हजार 286 रुग्णांना डिस्चार्ज
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 7 हजार 819 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 1 लाख 3 हजार 286 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 2 हजार 610 रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.79 टक्के इतके आहे. आजपर्यंत 1 हजार 923 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
जळगांव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.92 टक्के
जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत 55 हजार 460 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 53 हजार 752 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 389 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.92 टक्के इतका आहे. आजपर्यंत 1 हजार 319 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.70 टक्के
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 14 हजार 357 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 13 हजार 741 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 231 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.70 टक्के इतके आहे. आजपर्यंत 385 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात 642 रुग्णांवर उपचार सुरु
अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 67 हजार 859 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 66 हजार 192 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 642 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.54 टक्के इतका आहे. आजपर्यंत 1 हजार 025 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात 529 रुग्णांवर उपचार सुरु
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 7 हजार 874 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 7 हजार 180 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 529 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.18 टक्के इतके आहे. आजपर्यंत 165 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
( 22 डिसेंबर 2020 रोजीची रात्री 12.00 पर्यंतची माहिती )