नवी दिल्ली – युरोपियन देश, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील कोरोनाच्या नव्या विषाणूचा वाढता फैलाव पाहता, केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी नवे निर्देश जारी केले आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी नवीन मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी ) बदलली आहे.
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या एसओपीमध्ये भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या असून त्यात म्हटले आहे की, नवीन मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी २२.५९ पासून अंमलात येईल. तसेच एसओपीला ए आणि बी अशा दोन भागात विभागले गेले आहेत. भाग ए मध्ये जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे ही ब्रिटन सह युरोप आणि मध्य पूर्वेकडून येणारी उड्डाणे वगळता इतर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी आहेत. तर भाग बी मध्ये ब्रिटन सह युरोप आणि मध्य पूर्वेक कडील स्थानांवरून येणार्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी आहे.
भाग अ मध्ये जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे चार विभागात विभागली गेली आहेत. यामध्ये भारतात सहलीची योजना आखताना सर्व नियमांचे पालन करणे, विमानात चढण्यापूर्वी दिलेल्या सूचनांचे अनुसरण करणे आणि आगमन दरम्यान आणि नंतरच्या प्रवासाचे पालन करणे समाविष्ट आहे. भाग ए मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रवाशाला प्रवासापूर्वी स्वत: ची माहिती सादर करावी लागेल. तसेच आरटी-पीसीआर नकारात्मक तपास अहवालही सादर करावा लागतो. प्रवाश्यांना जाहीर करावे लागेल की, योग्य प्राधिकरणाने ठरवलेल्या मानकांनुसार आगमनानंतर १४ दिवस होम कोरेन्टाईनचे ते पालन करतील.
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी ऑनलाईन एअर सुविधा पोर्टलवर स्वत: ची घोषणापत्र भरावे लागेल. इतकेच नाही तर नेगेटिव्ह कोविड -१९ आरटी-पीसीआर अहवालदेखील अपलोड करावा लागेल जो प्रवासाच्या २ तासाच्या आतील असावा लागतो. प्रवाशांना पोर्टलद्वारे किंवा संबंधित एअरलाइन्समार्फत प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. तसेच प्रशासनाने ठरविलेल्या निर्णयांचे पालन करावे लागेल. कोरोनाचा नव्याने फैलाव सुरू झाल्यानंतर डीजीसीएने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविली होती, परंतु एअर आंतरराष्ट्रीय करारानुसार अनेक देशांतून भारतात विमान उड्डाणे येत आहेत.