नाशिक – नाशिक विभागात आज पर्यंत ८५ हजार २७८ रुग्णांपैकी ६५ हजार ६२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सद्यस्थितीत १७ हजार ५१४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत विभागात २ हजार १३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तशी माहिती उपसंचालक आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी दिली आहे.
वातावरणात होणार बदल व त्याचबरोबर कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाने कोरोनाची रुग्णसंख्या वाढतांना दिसते आहे. परंतु अशाही परिस्थितीत आरोग्य विभाग व प्रशासनाचे योग्य नियोजन यामुळे रुग्णबरे होण्याचे प्रमाण देखील दिसून येत आहे. विभागात जरी रूग्ण संख्या वाढत असली तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७६.९६ टक्के असून मृत्युदर २.५० टक्के इतका आहे. तसेच उपचार घेणाऱ्या रुग्णांना बरे करण्यासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.
जिल्हानिहाय कोरोना स्थिती अशी,
नाशिक – बरे होण्याचे प्रमाण ८१.५९ टक्के
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ३२ हजार ०४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २६ हजार ०४९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ५ हजार १८७ रुग्णांवर उपचार सुर असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.५९ टक्के इतका आहे. आजपर्यंत ८१३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
जळगांव – १७ हजार १०५ रुग्णांना डिस्चार्ज
जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत २४ हजार ३८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १७ हजार १०५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६ हजार ५१७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१५ टक्के इतका आहे. आजपर्यंत ७६५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे
धुळे – १ हजार ६८६ रुग्णांवर उपचार सुरु
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत ७ हजार ६७० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५ हजार ७५७ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १ हजार ६८६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.२३ टक्के इतके आहे. आजपर्यंत २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर – २६८ जणांचा मृत्यू
अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत १८ हजार ९२७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १५ हजार ६३६ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३ हजार ०२३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.५४ टक्के इतका आहे. आजपर्यंत २६८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
नंदुरबार – सर्वाधिक कमी रुग्णसंख्या
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत २ हजार ४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून नंदुरबार हा सर्वाधिक कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्हा आहे. तसेच १ हजार ०७९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १ हजार १०१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.७६ टक्के इतके आहे. आजपर्यंत ६५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
(स्रोत:-उपसंचालक आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाची दि.२६ ऑगस्ट २०२० रोजीची रात्री १२.०० पर्यंतची माहिती)