नवी दिल्ली – कोरोनावर मात करण्यासाठी लस शोधून तिचा वापर करण्यासही सुरुवात झाली आहे. वारंवार आपले स्वरूप बदलणाऱ्या कोरोनावर उपाय शोधण्यासाठी खूप प्रयत्न सुरू असले तरी याचे समूळ उच्चाटन होणे शक्य नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, कालांतराने त्याची तीव्रता कमी होत जाईल, आणि साधारण आजारासारखा तो आजार असेल. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे.
एमोरी विद्यापीठातील विषाणूतज्ञ जेन्नी लेवाईन यांच्या मते, आज ज्यांना कोरोनाची लस दिली जात आहे, त्यांना भविष्यातही कोरोनाचा धोका आहेच. पण तेंव्हा तो केवळ सर्दी, खोकला अशा साध्या स्वरूपात असेल.










