बंगळुरू – येथील एका स्टार्टअपने कोविड १९ बाधित व्यक्तींच्या शोध आणि जोखीम मूल्यमापनासाठी अनोखे मोबाइल अॅप आणले आहे. सेंटर फॉर ऑगमेंटिंग वॉर विथ कोविड १९ हेल्थ क्रिसिस (कवच ), या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) उपक्रमाने लिफास कोविड स्कोअर नावाचे कोविड जोखीम व्यवस्थापन प्रोफाइल विकसित करण्यासाठी बंगळुरूमधील स्टार्टअप अकुली लॅबची निवड केली आहे. अकुली लॅब कडे लवकर निदान , मूळ कारण विश्लेषण, तीव्र जोखीम मूल्यांकन, रोगनिदान आणि दीर्घकालीन रोगांवर घरी देखरेख यासाठी ‘लिफास’ हे क्लिनीकल-ग्रेड, नॉन-इन्व्हेसिव्ह , डिजिटल फंक्शनल बायोमार्कर स्मार्टफोन साधन आहे.
डीएसटीच्या मदतीने विकसित केलेले नवीन तंत्रज्ञान परंपरागत चाचणीला प्राधान्य देण्यासाठी लक्षणे नसलेल्या व्यक्तीमधील संभाव्य संसर्ग शोधेल तसेच लक्षणे न आढळणारी व्यक्ती बाधित होण्याच्या जोखमीचे मूल्यमापन करेल. मार्च मध्ये, केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने कोविड समस्येचे निराकरण करणार्या तंत्रज्ञानाचे समर्थन करण्यासाठी सहकार्य केले. मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्याच्या दिशेने उपाय शोधण्यासाठी चाचण्यांच्या अनेक फेऱ्यांनंतर अकुली लॅबची निवड झाली.त्यांच्या लिफास या उत्पादनास विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून ३० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे आणि आता आयआयटी मद्रास, हेल्थकेअर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटर (एचटीआयसी), मेडटेक इनक्यूबेटर यांनी आभासी पाठिंबा दिला आहे.
असे आहे अॅप
लिफास हे एक अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे ज्यात एखादी व्यक्ती मोबाइल फोनच्या मागील फोन कॅमेर्यावर ५ मिनिटे बोट ठेवते तेव्हा ते कपिलारी नाडी आणि रक्ताची मात्रेतील बदल टिपते. आणि अल्गोरिदम आणि सिग्नल प्रक्रिया तंत्रांसह ९५ बायोमार्कर्स मिळते. शरीरातील सिग्नलचा एक समूह कॅप्चर करण्यासाठी स्मार्टफोन प्रोसेसर आणि स्मार्टफोन सेन्सरची उर्जा हे वापरते. त्यानंतर फोटोप्लेथिस्मोग्राफी (पीपीजी), फोटो क्रोमॅटोग्राफी (पीसीजी), अर्टेरिअल फोटोप्लेथीस्मोग्राफी (एपीजी), मोबाइल स्पायरोमेट्री आणि पल्स रेट व्हेरिएबिलिटी (पीआरव्ही) या तत्त्वावर सिग्नलवर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर लिफास कार्डियो-श्वसन, हृदय-रक्तवहिन्यासंबंधी, रक्तविज्ञान, रक्तस्त्राव, न्यूरोलॉजी आधारित पॅरामीटर्स प्रदान करते जे शरीरातील सूक्ष्म पॅथोफिजियोलॉजिकल बदलांचा मागोवा घेण्यास सक्षम असतात. हे बदल पुढे ऑर्गन सिस्टम-व्यापी प्रतिसादामध्ये व्यक्त केले जातात. हे तंत्रज्ञान लोकसंख्या तपासणी, विलगीकरण केलेल्या व्यक्तींवर देखरेख आणि समुदाय प्रसार टप्प्यावर देखरेख ठेवण्यावर केंद्रित आहे. मेदांता मेडिसिटी रुग्णालयात केलेल्या अभ्यासात ९२ टक्के अचूकता, ९० टक्के ची विशिष्टता आणि ९२ टक्के ची संवेदनशीलतेसह लक्षणे आढळून न आलेल्या व्यक्ती शोधते हे सिद्ध झाले आहे.