सिन्नर – तालुक्यात कोरोनामुळे बुधवारी (२६ ऑगस्ट) दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनेगाव येथील ४२ वर्षाच्या पुरुषाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. न्यूमोनिया व श्वसनाचा तीव्र त्रास झाल्याने त्यांना २४ ऑगस्ट रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले होते. तर, शहरातील सिद्धिविनायक नगर मधील ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा नाशिक येथेच जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांना मधुमेह देखील होता. या दोघांच्या निधनाने तालुक्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २८ झाली आहे.