नाशिक – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे श्री.निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्तपदासाठीच्या मुलाखती स्थगित करण्यात आल्या आहेत. धर्मदाय सह आयुक्त जयसिंग झपाटे यांनी याबाबतचे निवेदन दिले असून कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात येणारा आहे.
सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या ९ विश्वस्त पदांचा साठी १ मार्च २०२१ पासून मुलाखती घेण्यात येणार होत्या. दिनांक १२ मार्च पर्यंत या मुलाखती होणार होत्या दरम्यानच्या काळात धर्मदाय आयुक्तालय येथील एक अधिकारी, कर्मचारी, वकील यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. अशा वातावरणात मुलाखती घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. मुलाखतीसाठी जिल्हाभरातून-१८५ उमेदवारांनी अर्ज केले असल्याने तसेच त्यात वयोवृद्धांना भरणा अधिक असल्याने मुलाखती स्थगित करणे योग्य असल्याचे मत धर्मदाय आयुक्त यांनी व्यक्त केले. त्यानुसार मुलाखती स्थगित करण्यात आल्याची सूचना तातडीने जाहीर करण्यात आली.
यामुळे आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर नवीन वेळापत्रक लावण्यात येणार आहे. वैद्यकीय कारण लक्षात घेता या मुलाखती स्थगित करण्यात आल्याचे धर्मदाय सह आयुक्त जयसिंग झपाटे यांनी म्हटले आहे.