नवी दिल्ली – कोरोना साथीच्या रोगामुळे या वर्षाच्या अखेरीस, जगभरात 50 दशलक्षहून अधिक नकोशा गर्भधारणेची शक्यता आहे. त्याच वेळी, 3.3 कोटी असुरक्षित गर्भपात होण्याची भीती देखील आहे. अमेरिकन थिंकटँक गुडमॅचर संस्थेच्या म्हणण्यानुसार कोरोनावरील निर्बंधामुळे सुरक्षित लैंगिक आरोग्य सेवा कोलमडून गेली आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, या वर्षाच्या अखेरीस, 50 दशलक्षाहून अधिक महिलांना गर्भनिरोधक साधने मिळणार नाही. परिणामी, त्यांना नकोशी गर्भधारणा स्वीकारावी लागेल. श्रीमंत देशांमध्ये, कोरोना साथीच्या रोगामुळे प्रजनन दर वाढण्याचा अंदाज आहे. अशा प्रकारे सिंगापूरमध्ये कोरोना रोगापूर्वी प्रजनन दर 1.14 टक्के होता जो आता वाढून 2.1 टक्के झाला आहे. काही तज्ञांचा असा विश्वास आहे की, जर सरकार गर्भनिरोधकांवर सबसिडी दिली तर महिलांना त्याचा योग्य लाभ मिळून कुटुंब नियोजनाला चालना मिळेल. नागरिकांच्या चांगल्या जगण्याच्या धोरणाला चालना मिळेल .भारतातील आरोग्य सुविधांच्या माहितीनुसार डिसेंबर ते मार्च या कालावधीत गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये 15 टक्के आणि निरोध वाटपात 23 टक्के घट झाली आहे. येथील काही शहरामधील लोक आपल्या कुटुंबापासून दूर होते. मात्र मार्चमध्ये लॉकडाउननंतर ते घरी परतले.