आदर्शपणे गुंतवणूक करणाऱ्यांनी मालमत्ता वर्गाच्या मागील कामगिरीच्या आधारावर आणि आर्थिक लक्ष्यांच्या आधारावर गुंतवणूक निवडली पाहिजे. सामान्य नियम म्हणून, गुंतवणूकदारांनी त्याचा कालावधी कमी करुन इक्विटी आणि कर्जामध्ये गुंतवणूकीच्या धोरणाकडे नेले पाहिजे. कारण कठीण वेळा सांगून येत नाही. कोरोना संकटामुळे आपत्कालीन निधीची गरज अधोरेखित झाली आहे. हा एक बचत फंड आहे जो केवळ कठीण काळासाठी वापरला जावा.
खालील बाबी ध्यानात घ्या
आपत्कालीन निधी : २००८ च्या मंदीच्या काळाचे संकट ओसरले होते, परंतु साथीने संपूर्ण जग थांबवले होते. आपत्कालीन निधी तयार असणे आवश्यक असून तो कठीण काळातच वापरला जाऊ शकतो. गुंतवणूकदारांना त्यांचा तीन ते सहा महिन्यांचा खर्च आपत्कालीन निधी म्हणून ठेवणे आवश्यक असेल.
सोन्यात गुंतवणूक योग्य : सोन्यात गुंतवणूक करण्यात फायदा होतो. कारण जेव्हा कठीण प्रसंगी शेअर बाजारात अडचण येते, तेव्हा सोन्याच्या किंमती वरच्या बाजूस जात असतात.
ब्लॉगद्वारे देखील पैसे कमवता येतात: प्रत्येकासाठी उत्पन्नाचा दुसरा स्रोत असणे खूप महत्वाचे आहे. ते पैसे कमावण्याचे एक वेगळे साधन देखील असू शकते. मागील वर्षी बेरोजगारीचा दर २४.४८ टक्के होता, ज्यावरून असे सुचवले जाते की, आपली नोकरी केव्हाही जाऊ शकते. आज लोक फक्त यु ट्युबवर व्हिडिओ टाकून पैसे कमवत आहेत, तर बरेच जण ब्लॉगद्वारे देखील पैसे कमवत आहेत.
गुंतवणूक करणे चांगला पर्याय : आपल्या नवीन कौशल्याद्वारे आपल्या कुटुंबासाठी उत्पन्नाचा दुसरा स्रोत वाढवू शकता. स्वतःसाठी उत्पन्नाचे आणखी एक स्त्रोत उत्पन्न करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे आपल्या पैशाची हुशारीने गुंतवणूक करणे होय. इक्विटी, म्युच्युअल फंड्स, गोल्ड किंवा रिअल इस्टेटसारख्या मालमत्ता वर्गात सातत्याने नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे.