मिलान – इटलीचे प्रधानमंत्री गुसेप कोन्ते यांनी आपल्या प्रधानमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मागच्या आठवड्यात त्यांना सिनेटमध्ये बहुमत सिद्ध न करता आल्याने, त्यांचे सरकार अल्पमतात आले होते. कोरोना महामारीमुळे इटलीत ८५ हजारांपेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले असून, कोरोना काळात झालेल्या सरकारी खर्चाबाबत विविध पक्षांमध्ये मतभेद झाल्याने कोन्ते याचे आघाडी सरकार अडचणीत आले आहे. इटलीतील माध्यमांच्या अंदाजानुसार आता प्रधानमंत्री पदावर नवीन व्यक्ती येऊ शकते, अथवा इटलीत सार्वजनिक निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.