विजय पवार,निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी,नाशिक
कोरोना महामारीची दुसरी लाट आली आहे जवळपास घराआड कोरोनाची लागण झाली आहे यामुळे आम्ही सरकार,राजकीय कार्यकर्ते त्यांचे नेते आणि सर्वसामान्य आरोग्य यंत्रणा असे सर्वजण हतबल झालोआहोत. याला जबाबदार कोण आहे हे लक्षात न घेता सर्वांनी हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून हा महाभयंकर संकटाचा मुकाबला करायला हवा मग ते शेजाऱ्याला मानसिक आधार देण्यापासून तर त्याला दवाखान्यात मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
शासन यंत्रणेवर विसंबून राहता सर्वराजकीय पक्ष,सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, दक्षता पथक मोठं मोठे व्यापारी,शिर्डी संस्थान,बालाजी देवस्थान,सिद्धिविनायक देवस्थान या आणि इतर धार्मिक संस्थानी ठिकठिकाणी कोविड सेंटर उभारली पाहिजेत. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचारासाठी रुग्णालय त्यात पुरेसे बेड,ऑक्सिजन बेड,व्हेंटिलेटर, त्याचबरोबर सध्या प्रभावी उपाय असलेले रेडिमेसीविर इंजेक्शन याची व्यवस्था करणे त्याच बरोबर रुग्णाला व त्याचे नातेवाईकांना मानसिक आधार देण्याची गरज भासते ती देण्याची तयारी मित्र नातेवाईक शेजारी पाजारी यांनी केली पाहिजे.
शासकीय पातळीवर रुग्णाला मदत म्हणून रुग्णालयाचे नाव,पत्ता,मोबाईल अथवा फोन नंबर साठी अँपची निर्मिती केली आहे. मात्र त्यावर संपर्क केला तर फोन घेत नाही. घेतला तर बेड नाही असे म्हणतात शासकीय अधिकारी, राजकीय नेते फोन घेत नाहीत अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.
दवाखान्यात ऑक्सिजन बेड आहेत तर ऑक्सिजन नाही रुग्णाला बेड नसल्याने मोकळ्या जागेत टाकले जाते पाय-यावर ठेवले जाते दोन दोन तास त्याच्याकडे लक्ष दिले जात नाही,आवश्यक ते इंजेक्शन मिळत नाही,एक हजारचे इंजेक्शन ४० हजारला विकले जाते. इतका अनागोंदी कारभार चालला आहे. एकंदरीत आम्ही सर्वजण हतबल झालो आहोत.