नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर असंख्य देशोधडीला लागल्या आहेत. अशा काळात नव्या संसदेचे काम का केले जात आहे, असा सवाल ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी माईम या पक्षाचे नेते कमल हसन यांनी उपस्थित केला आहे.
कमल हसन यांनी ट्विट करुन सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. नव्या संसदेची नक्की गरज आहे का. सध्याचा काळ किती कठीण आहे, याचा आपण विचार करणार आहोत की नाही, असेही हसन यांनी म्हटले आहे. कोरोनामुळे देशातील असंख्य नागरिक विविध प्रश्नांनी वंचित आहेत. तर, काहींना तर जेवणाची भ्रांत आहे. अशा परिस्थितीत कोट्यवधी खर्चून नवे संसद भवन बांधणे गरजेचे आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सोशल मिडियात यासंबंधीची चर्चा सुरू झाली आहे.