जिनिव्हा – जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पाश्चात देशात संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. कोरोना संक्रमणामुळे अनेक देशांतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, कमी व मध्यम उत्पन्न असणार्या अनेक देशातील दीड दशलक्षाहून अधिक लोकांची ऑक्सिजनची त्वरित गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिलिंडरची आवश्यकता आहे. तसेच कोविड -१९ ऑक्सिजन इमर्जन्सी टास्कफोर्स कोरोना मृत्यूपासून बचाव करण्यासाठी ऑक्सिजनच्या वापरावर कार्यरत असलेल्या प्रमुख संस्थांना एकत्र आणते.
या टास्कफोर्समधील भागीदार देश व संस्था ऑक्सिजनच्या गरजेचे मूल्यमापन करतील, एवढेच नाही तर ते सर्वात जास्त नुकसान झालेल्या देशांना ऑक्सिजन पुरवठा व तांत्रिक सहाय्य करतील.
डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की, स्वस्त आणि ऑक्सिजनची प्राप्ती करण्यासाठी कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी एक मोठे आव्हान असून कोरोनाच्या वाढत्या घटनांनी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड दबाव येत आहे.
कारण वेळेवर ऑक्सिजन नसल्यामुळे लोकांचा मृत्यू होतो. डब्ल्यूएचओच्या एका अंदाजानुसार कमी व मध्यम उत्पन्न असणार्या देशातील सुमारे दीड दशलक्ष लोकांना दररोज ११ लॉकिंग ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता आहे. सध्या २५ देशांमध्ये ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली आहे.
आफ्रिकेतील अनेक देशांत ऑक्सिजन सिलिंडर्सची मोठी गरज आहे. तथापि, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणलाही वेग आला आहे. यात भारताचे मोठे योगदान आहे. कोविड लस पुरवण्यात भारताच्या पाठिंब्यामुळे ६० हून अधिक देशांना लसीकरण प्रक्रिया सुरू करण्यास मदत झाली आहे.
भारताने कोविड लसीचे २२९ लाख डोस विविध देशांना पाठविले आहेत. यापुढेही भारत अनेक देशांना लस पुरवठा सुरूच ठेवेल. यात पुढे टप्प्याटप्प्याने अनेक देशांचा सहभाग असेल.