चेन्नई – शहरातील प्रसिद्ध डॉक्टर सायमन हर्क्युलस हे कोविड रुग्णांवर उपचार करीत होते, तसेच गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांना विषाणूची लागण झाली होती. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. परंतु त्यांच्या निधनानंतर सुमारे ११ महिन्यांनी मद्रास उच्च न्यायालयाने त्यांचा मृतदेह थडग्यातून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ. सायमन हर्क्युलस यांची पत्नी आनंदी यांनी आपल्या पतीचा मृतदेह परत मिळावा याकरिता रिट याचिका दाखल केली होती. सदर याचिका मान्य करीत कोर्टाने मृतदेहाचे अवशेष वेलांगडू स्मशानभूमीच्या थडग्यातून काढून किलपुक स्मशानभूमीत पुरण्याचे निर्देश दिले.
कोवीड -१९ प्रोटोकॉल पाळला जाणे आवश्यक आहे. परंतु मृतदेह एका स्मशानभूमीतून काढला जावा आणि दुसऱ्या दफनभूमीत दफन करण्यात यावा, तसेच कुटुंबातील सदस्यांनी धार्मिक प्रथा पाळल्या पाहिजेत, असे म्हटले होते.
२४ एप्रिल २०२० रोजी कोर्टाने महापालिकेचा आदेश रद्द केला. यापूर्वी मनपाच्या आदेशानुसार, आनंदी यांची याचिका नाकारण्यात आली. ज्यामध्ये तिने आपल्या पतीचा मृतदेह एका स्मशानभूमीतून काढून किलपुक स्मशानभूमीत पुरण्याची विनंती केली होती.