नाशिक ः कोरोनाच्या संकटकाळात लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारनेही सेवाकार्य सुरू केले आहे. डॉ. नुपूरा प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली हे काम केले जात आहे.
आर्सेनिक अल्बम ३०या होमिओपॅथी टेबलेट्स तसेच ३०० बाटल्या सॅनिटायझर आणि ४८ बाटल्या फिनाईल रामकृष्ण आरोग्य संस्थेचे संस्थापक स्वामीजी श्रीकंठनंद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याचे जिल्हा प्रांतपाल अभय शास्त्री यांनी सांगितले. या गोळ्या मोतीवाला होमिओपॅथी कॉलेज यांनी दिल्या. त्र्यंबकेश्वर जवळील आदिवासी गावांमध्ये वितरित करण्याची जबाबदारी स्वामीजी श्री कंठानंद यांच्यामार्फत लायन्स क्लब ऑफ नासिक स्टार ने पार पाडली. गोळ्यांविषयीची माहिती नागरिकांना देण्यात आली. सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे गावातील ७५० कुटुंबातील सदस्यांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वितरण करण्यात आले. त्र्यंबकेश्वर जवळील ब्राह्मणवाडे येथील शाळेतील ८वी ते १० वीच्या मुलांसाठी ७० पाठ्यपुस्तके देण्यात आली. याप्रसंगी प्रभू यांच्यासह नीलिमा डावरे, डॉ. अमित प्रभू हेही उपस्थित होते.