प्रकल्प संयोजक नंदकिशोर साखला यांनी स्वीकारले दोन पुरस्कार
नाशिक – कोरोना महामारीने सर्व विश्व व्यापले आहे. त्यावर मात करण्यासाठी अनेकांप्रमाणे भारतीय जैन संघटनेने रचनात्मक व सर्वव्यापी कार्य केले. या कामाची दखल घेऊन शांतीलाल मुथा यांनी नुकतेच नाशिकचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला व सहकारी टीमला सन्मानित केले . लॅाकडाऊन काळातील फिरते दवाखाने व नंतर मिशन झिरो अंतर्गत मोठ्या प्रमाणावर अँटीजेन टेस्ट करून कोरोना नियंत्रणात आणला यासाठी पुरस्कृत करण्यात आले. तसेच दीर्घकालीन सेवाकार्यासाठी विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला .
आठ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभर विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस ) पुढाकाराने राज्यस्तरावर मोठया प्रमाणावरती सेवा कार्य सुरु आहे. नाशिक शहरात तीन फिरत्या दवाखान्याद्वारे एप्रिल व मे महिन्यात १२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली.गरजेनुसार वैद्यकीय सेवा व विनामूल्य औषधे पुरविण्यात आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यात यश मिळाले. मे ते जुलै दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या सहभागाने नागरिकांना होमिओपॅथिक औषधांचे वाटप करण्यात आले.मिशन झिरो अंतर्गत जुलै ते सप्टेंबर या काळात सलग ६२ दिवसात ७५ हजारांहून अधिक अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात १२६८० पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध लागला. स्मार्ट हेल्मेटद्वारे एक लाखापेक्षा जास्त थर्मल स्क्रीनिंगमुळे पुढील संक्रमण थांबण्यास व अधिक फ़ैलाव न होण्यास मदत झाली. संघटनेने या शिवाय जनजागृती अभियान, तापमान व प्राणवायू प्रमाण तपासणी , आरटीपीसीआर स्वॅप चाचण्या, प्लाझमा दान हे कामही अविरत सुरुच ठेवले. अनेक संशयित रुग्णांचे लवकर निदान झाल्याने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. या कार्यासाठी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा , नाशिकचे पालकमंत्री छगनराव भुजबळ, महापौर सतीशनाना कुलकर्णी , मनपा आयुक्त कैलास जाधव , विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी सूरज मांढरे व सर्व लोकप्रतिनिधींचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले .

राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार वितरण समारंभ ऑनलाईन पद्धतीने झाला. यावेळी बीजेएस चे संस्थापक शांतीलाल मुथा, सुप्रसिद्ध उद्योजक वल्लभ भन्साली ,राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड , महासचिव संप्रती संघवी यांच्या हस्ते नंदकिशोर साखला यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी साखला म्हणाले की, कोरोनाचे संकट काही प्रमाणात आटोक्यात आले असले तरीही आव्हाने संपलेली नाहीत. ३५ वर्षांपासून भारतीय जैन संघटना विविध सामाजिक उपक्रम राबवत लोकसेवेचे वसा पुढे नेत आहे . जोपर्यंत कोरोनावर संपूर्ण विजय मिळवून त्याला हद्दपार करीत नाही तोपर्यंत सेवाकार्य अखंडितपणे सुरु राहील , आपल्याला या कार्यात दीपक चोपडा, यतिश डुंगरवाल, ललित सुराणा, अभय ब्रम्हेचा, चंद्रशेखर (गोटू) चोरडिया व अनेक कार्यकर्त्यांचे पाठबळ लाभल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले .