नवी दिल्ली – ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने रशियाच्या स्पुटनिक-व्ही या लसीच्या डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांमध्ये तपासणी करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. मध्यंतरी याच लसीच्या दुष्परिणामाची बाब समोर आली होती, त्यामुळे डीसीजीआयने हा निर्णय घेतला आहे. सविस्तर विचारविनिमयानंतर समितीने हा निर्णय घेतला असून, चाचणी यशस्वी होणे अनिवार्य असल्याचे डॉ. रेड्डीज लॅबच्या समितीने म्हंटले आहे. रशियाने १२ ऑगस्ट रोजी कोरोनावरील पहिली प्रभावी लस तयार केल्याचा दावा केला होता. मात्र, काही देशांतील शास्त्रज्ञांच्या गटाने या लसीच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे संबंधित लसीची भारतातील चाचणी थांबवण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. उपाययोजना करूनही संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत नसल्याने सर्वजण लशीवर अवलंबून आहेत. जगात निरनिराळ्या ठिकाणी लशींवर काम सुरु आहे. या शर्यतीत भारतातील तीन लसी आघाडीवर आहेत. त्याचबरोबर रशिया आणि चीननेही ही लस तयार करुन नोंदविली आहे. मात्र लसीची चाचणी केल्यावर काहीअंशी त्याचे दुष्परिणाम दिसून आले. ही लस सध्या तिसर्या टप्प्यातील टप्प्यात आहे. रशियाने तयार केलेल्या या लसीची भारतातही मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जाणार होती परंतु डीसीजीआय अर्थात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने हा प्रस्ताव फेटाळला आहे.