– शिवसेना व सत्कार्य फाऊंडेशनचा उपक्रम
– भाविकांनी महाप्रसादाचा आपल्या आपल्या घरी लाभ घ्यावा, सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, चारुशीला गायकवाड यांचे आवाहन
नाशिक – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व सत्कार्य फाऊंडेशनच्या वतीने शुक्रवारी ५ मार्च रोजी तिडके नगर येथे श्री गजानान महाराज प्रकट दिन सोहळा विधीवत पध्दतीने पूजा व आरती करुन साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. परिसरातील सर्व भाविकांना घरोघरी बंद पाकीटातील बुंदीच्या प्रसादाचे वाटप केले जाईल.
शिवसेना व सत्कार्य फाऊंडेशनतर्फे दरवर्षी औदुंबर वाटीका उद्यानात मोठ्या स्वरुपात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा केला जातो. पीठले व भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप होते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. या उद्यानात ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वैभव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली २१ महिला श्री गजानन महाराज विजय ग्रथांचे पारायण करणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता मर्यादीत भाविकांच्या उपस्थितीत आरती व पूजा विधीवत पध्दतीने करण्यात येईल. दुपारी ३ वाजेपासून तिडके नगर, जगताप नगर, उंटवाडी, पाटीलनगर, हेडगेवार नगर, कर्मयोगी नगर,कालिका पार्क या भागात घरोघरी भाविकांना बंद पाकीटात बुंदीच्या प्रसादाचे वाटप करण्यात येईल. सोबत मास्कही दिले जातील. त्यामुळे भाविकांना उद्यानात गर्दी करु नये. कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे.
भाविकांनी महाप्रसादाचा आपल्या आपल्या घरी लाभ घ्यावा असे आवाहन सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख ) , चारुशीला गायकवाड (देशमुख ) , रविद्र सोनजे, संजय टकले, बाळासाहेब मिंधे, श्रीकांत नाईक, प्रभाकर खैरनार, डॅा. शशिकांत मोरे, मयुर आहेर, हंसराज वडघुले, मनोज पाटील, मंदार सडेकर यांनी केले आहे. अशोक पाटील, राहुल काळे, सचिन जाधव, अविनाश कोठावदे, मगन तलवार, यशवंत जाधव, निलेश ठाकुर, मयुर ढोमणे, बापू महाले, कुणाल महाजन, बापूसाहेब आहेर, व्ही. एस. पाटील, जितेंद्र जैन, राहुल कदम, शैलेश महाजन, मकरंद पुरेकर, मनोज वाणी, दिग्विजय पवार, डॅा. आर.पी. चोपडे, डॅा. पी.डी. महाजन, सचिन राणे, परेश येवले, राकेश येवले, राम भंडारी, विजय शिरोडे, धवल खैरनार, सुजाता काळे, मीना टकले, मनिषा मिंधे, संध्या बाोराडे, ज्याेत्स्ना पाटील, मीरा खैरनार, उज्वला सोनजे, मीनाक्षी पाटील, प्रतिभा पाटील, संकेत गायकवाड, प्रथमेश पाटील, सार्थक कोळपकर आदी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे.