नांदगाव- नांदगाव शहरातील नागरीकांना तसेच फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते व इतर व्यावसायिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गुरुवारी होणाऱ्या आठवडे बाजार पुढील आदेश येई पर्यंत स्थगित करण्यात येत आहे.तसेच कोणीही बाजाराला येऊ नये, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.
नांदगाव तालुक्याचे ठिकाण असल्याने बाजारात इतर तालुक्यातील छोटे मोठे व्यापारी,व्यवसायिक
शेतकरी धान्य व भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी येत असतात.त्यामुळे खूप गर्दी होत असते.कोरोनाचा तालुक्यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून गुरुवारी होणारा आठवडे बाजार पुढील आदेश येई पर्यंत स्थगित करण्यात येत आहे. तसेच विवाहासाठी ५० पेक्षा अधिक व्यक्ति एकत्र येणास मनाई आहे. याची सर्व मंगलकार्य लॉन्स यांनी नोंद घ्यावी. तसेच कोरोनापासुन बचावासाठी सर्व नागरीकांनी मास्क व सॅनिटायझर वापरणे तसेच शाररीक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. या सुचनांचे पालन न केल्यास सबंधित व्यक्ती किंवा संस्थावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यधिकारी गोसावी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.