उल्लेखनीय कामगीरी बजावणा-या अधिका-यांचा गोडसे यांच्या हस्ते सत्कार
नाशिक ः कोरोना या महामारीमुळे अवघा देष मेटाकुटीला आलेला असून कोरोना हे देषासमोरील सर्वात मोठे संकट आहे. या संकट काळात जीवाची पर्वा न करता आपण जिल्हयातील सर्वसामान्यांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेत केलेली समाजसेवा अभिनंदनीय आणि अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे. कोरोना काळात केलेल्या आमच्या कार्याची खासदारांनी दखल घेतल्यामुळे सर्वच अधिकारी, कर्मचा-यांच्या चेह-यावर यावेळी ओसंडून आनंद वाहत होता.
शिवसेनेचे पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या जिल्हयातील अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महापौर विनायक पांडे, महानगर प्रमुख सचिन मराठे, महेष बडवे आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कारमुर्तींमध्ये तहसिलदार अनिल दौंड, धान्य वितरण अधिकारी श्वेता पाटोळे, तलाठी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष निळकंठ उगले, बाबासाहेब खेडकर, रमेश उगले, पांडुरंग गोतिसे, अरूण पाटील, कविता गांगुर्डे, प्रिती अग्रवाल, पुनम लिलके, मनिशा पाटील, रंजना बाराते आदींचा सत्कार गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख नाना काळे, गोरख वाघ, दत्ता कोठावदे, संजय चिंचोरे, तेजस गोयल, रोहित पारेख, दस्तगीर रंगरेज आदींनी परिश्रम घेतले.