नवी दिल्ली – कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस तयार करण्यासाठी जगात सर्वत्र प्रयत्न सुरु आहे, मात्र, कोरोना विषाणूंसोबत इतर तीन आजारांवर परिमाणकारक ठरणारी लस तयार केल्याचे नुकतेच समोर आले आहे. २०० शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. कोरोना विषाणूपूर्वी जगात पसरलेल्या दोन साथीच्या रोगांमध्ये सारस आणि मार्सचे विषाणू जवळजवळ एकसारखे असल्याचे आढळून आले. हे तीन विषाणू स्पाइक प्रोटीनद्वारे मानवी पेशींवर आक्रमण करतात. त्यामुळे अशा तिहेरी आजारांवर लस तयार करण्याकडे शास्त्रज्ञांचा कल असल्याचे दिसून आले.
६ देशांमधील १४ अग्रगण्य संशोधन संस्थांमधील २०० शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन अमेरिकेच्या ७ लाख रुग्णांच्या अहवालाच्या विश्लेषणाचा अभ्यास केला आहे. या रूग्णांना देण्यात आलेली औषधे आणि त्यांच्यातील सुधारणा याकडे वैज्ञानिकांचे लक्ष आहे. या आधारावर, त्यांनी महत्त्वपूर्ण औषधांचा शोध लावला आहे. कोरोना विषाणूची प्रथीने आणि सेल्युलर प्रक्रिया, २००२ मध्ये पसरलेल्या एसएआरएस या साथीच्या रोगावर आणि २०१२ मध्ये पसरलेला मार्स सर्वत्र पसरलेला विषाणू सारख्याच मानवी पेशींवर हल्ला करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आधारावर, शास्त्रज्ञांनी लस तयार केली आहे. सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनाच्या निकालांच्या आधारे, शास्त्रज्ञ आता सार्वत्रिक औषध तयार करण्याच्या दिशेने कार्य करत असल्याचे सांगण्यात आले आहे.