मुंबई – कोरोनाची लागण झालेल्या एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचा-यांनाही आता वैद्यकिय उपचाराचा खर्च मिळणार आहे. २ सप्टेंबर २०२० पासून वैद्यकिय उपचारासाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यामध्ये त्यांच्या कुटुंबियांचाही समावेश असल्याचं परिपत्रक कर्मचारी वर्गाचे महाव्यवस्थापक माधव यांनी काढले आहे. हा निर्णय २ सप्टेंबर २०२० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील.