लातूर – कोरोनाला प्रतिबंध करणारी लस पुढच्या महिन्यात येऊ शकते अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे. लातूरच्या स्वामी रामानंदतिर्थ व्याख्यानमालेच्या वतीने कोरोनासंदर्भात आज आयोजित केलेल्या फेसबुक संवादात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुढच्या वर्षी मार्च ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकते अशी शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. लस येत नाही तोपर्यंत मास्क लावणे, हाथ धुणे आणि परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणे या नियमांचं पालन करत राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, द व्हॅकसिन्स अलाएन्स संस्थेच्या ड़ॉ रंजना कुमार हे देखील या फेसबुक संवादात सहभागी झाले होते. पर्यावरणाचे अभ्यासक आणि पत्रकार अतुल देउळगावकर यांनी फेसबुक संवादाचं संयोजन केलं.