वॉशिंग्टन – कोरोनावर मात करण्यासाठी कोरोनाची लस आल्यावर आता तिचा सर्वत्र वापर सुरू झाला आहे. लस घेतल्यानंतर होणाऱ्या परिणाम, दुष्परिणामांवरील चर्चा सातत्याने सुरू असते. अमेरिकेत सध्या कोरोनावरील फायझर आणि मॉडरना या लसी दिल्या जात आहेत. पण त्यानंतर लस दिलेल्यापैकी ३६ लोकांना तरी थ्रोम्बोसायटोपेनिया (रक्ताशी संबंधित दुर्मिळ आजार) झाल्याचे समोर आले आहे.
हा आजार जीवघेणाही ठरू शकतो. ही लागण झालेल्या रुग्णांपैकी डॉ. ग्रेगरी मायकेल यांचा मृत्यू झाला आहे. ते केवळ ५६ वर्षांचे होते. फायझरची लस दिल्यानंतर केवळ १६ दिवसांत ब्रेन हॅमरेजने त्यांचा मृत्यू झाला. त्यातच थ्रोम्बोसायटोपेनिया आजारामुळे त्यांच्या प्लेटलेट्स शून्यावर आल्या. दरम्यान, हा आजार कोणत्या लसीमुळे झाला, ते अद्याप स्पष्ट नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
अमेरिकेत आतापर्यंत ४.३ कोटी लोकांनी कोरोनाची लस घेतली असून त्यातील ३६ जणांना त्रास झाला आहे. वैज्ञानिकांच्या मते, एवढ्या लोकसंख्येपैकी फारच कमी जणांना हा त्रास झाला असून कधीकधी यात गडबड होऊ शकते.