केजीएमयूमध्ये झालेल्या कोरोना व्यवस्थापन विषय वेबिनारमध्ये डॉ. भार्गव म्हणाले की, कोरोनाची लस आली तरी त्याचे दोन ते तीन डोस द्यावे लागू शकतात. त्यात तीन ते चार आठवड्यांचा कालावधी जाऊ शकतो. त्यानंतरही लस प्रभावी ठरली नाही तर बुस्टर डोस करावा लागू शकतो. लस दिल्यानंतरही कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क वापरावा लागणार आहे. मास्क हा लशीसारखाच काम करतो. असे दिसते की आणखी काही काळासाठी आपल्याला मास्क वापरावा लागू शकतो. भारतात एकूण पाच लसींचे काम सुरू आहेत. त्यात २ भारतीय आणि ३ परदेशी आहेत. कोरोनाला नष्ट करण्यासाठी केवळ लस उपुक्त नाही तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक असल्याचे डॉ. भार्गव यांनी सांगितले.