धुळे – कोरोना संसर्गाची लक्षणे आढळल्याने शिरपूर येथील शिक्षकाने तापी नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राजेंद्र भानुदास पाटील असे या शिक्षकाचे नाव आहे. कोरोनाची काहीशी लक्षणे आढळल्याने ते घाबरले. आपल्याला कोरोना झाला या भीतीतून त्यांनी सावळदे फाटा येथे तापी नदीत उडी मारुन आत्महत्या केली. पाटील यांची दुचाकी आणि त्यांची डॉक्टरांकडची फाईल पोलिसांना मिळाली आहे. या घटनेमुळे शिक्षकांसह शिरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.