चंदीगड – हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी ते स्वतः स्वयंसेवक बनले होते. त्यांनी ही लस घेतली होती.
विज यांनी ट्विट करुन माहिती दिली की त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. अंबाला कॅन्ट येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते उपचारार्थ दाखल झाले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.