नाशिक – कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी लागणारे इंजेक्शन किंवा औषधे मिळत नसल्याची तक्रार वारंवार केली जात आहे. त्याची दखल अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेतली आहे. म्हणूनच गरजूंनी मिळत नसलेल्या इंजेक्शन किंवा औषधाची माहिती व्हॉटसअॅप हेल्पलाईन वर पाठवावी. त्यानंतर संबंधितांना ती उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या संसर्गावर उपचाराकरिता लागणारी रेम्डीसीवर व टॉसिलिझुमॅब इंजेक्शन्स, फॅबीफ्ल्यु टॅब्लेट ही औषधे रुग्णांना उपलब्ध व्हावीत याकरीता दररोज त्यांच्या उपलब्ध साठ्याची माहिती संकलित करून जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठविण्यात येत आहे. तसेच ही औषधे ज्या मेडीकल्समध्ये उपलब्ध आहेत त्यांचे संपर्क क्रमांक वेळोवेळी प्रसिद्ध केले जात आहेत, असे अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त माधुरी पवार यांनी सांगितले आहे.
ऐवढे करुनही इंजेक्शन किंवा औषधे उपलब्ध होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. त्याची दखल पवार यांनी घेतली आहे. म्हणूनच त्यांनी व्हॉटसअॅप हेल्पलाईन उपलब्ध करुन दिली आहे. नागरिकांनी या हेल्पलाईनवर त्यांना लागणाऱ्या औषधाची माहिती पाठवायची आहे. ती मिळताच आणि त्याची शहानिशा होताच संबंधितांना ती उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे पवार यांनी ‘इंडिया दर्पण लाईव्ह’शी बोलताना सांगितले आहे.
असे मिळवा औषध किंवा इंजेक्शन
जे इंजेक्शन किंवा औषध मिळत नाही त्याची डॉक्टरने लिहून दिलेली चिठ्ठी (प्रिस्क्रीप्शन), रुग्णाचे आधार कार्ड आणि कोरोना अहवाल हे एफडीएच्या हेल्पलाईनवर व्हॉटसअॅप करावे. त्यानंतर एफडीए अधिकारी त्याची शहानिशा करतील. संबंधित मागणीकर्त्याला ती एफडीएकडूनच उपलब्ध करुन देतील.
एफडीएचा व्हॉटसअॅप क्रमांक खालील प्रमाणे