नाशिक – ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीची आढावा बैठक भुजबळ फार्म येथे संपन्न झाली. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, माजी आमदार हेमंत टकले यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते. या बैठकीनंतर स्वागताध्यक्ष छगन भुजबळ व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोरोनाबद्दल असलेल्या सर्व नियमांचे कोटकोर पालन करुन संमेलन घेतले जाणार असल्याचे सांगितले.
बघा, भुजबळ साहित्य संमेलनाची तयारी आणि आयोजनाबद्दल काय म्हणाले? (व्हिडिओ)
https://www.facebook.com/ChhaganCBhujbal/videos/866325303916982/