मुंबई – भारतात गेल्या दोन महिन्यांत रुग्णांची संख्या अशी काही वाढली की, जगात १७ व्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर आला आहे. सातत्याने रुग्णवाढीत अमेरिका, ब्राझील, इटली आणि फ्रान्स हे देश भारताच्याही पुढे आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या चोवीस तासांत देशामध्ये 17 हजार 407 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या एक महिन्यातील ही सर्वाधिक संख्या आहे, असेही केंद्राचे म्हणणे आहे. यापूर्वी 29 जानेवारीला 24 तासांत 18 हजार 855 रुग्ण आढळले होते. तसेच चोवीस तासांत 89 रुग्णांचा मृत्यू झाला. आता देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 11 लाख 56 हजार 923 आणि जीव गमावणाऱ्यांची संख्या 1 लाख 57 हजार 435 झाली आहे.
अमेरिकेच्याही पुढे ब्राझील
गेल्या दोन–तीन दिवसांमध्ये ब्राझीलमध्ये आढळलेली रुग्णांची संख्या लक्षात घेता हा देश अमेरिकेच्याही पुढे गेल्याचे दिसत आहे. वर्ल्डोमीटरनुसार बुधवारी ब्राझीलमध्ये एकाच दिवसांत 74 हजार 376 रुग्ण आढळले. ही जगातील सर्वाधिक संख्या आहे. तर अमेरिकेत 66 हजार 879 रुग्ण आढळले. जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 11.57 कोटी झाली आहे. यात 9 कोटी 14 लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर 25.7 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
95 टक्के रुग्ण केवळ सहा राज्यांत
महाराष्ट्र, पंजाब, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सातत्याने रुग्ण वाढत आहे. देशातील एकूण संक्रमणात 85.51 टक्के वाटा या सहा राज्यांचा आहे.
महाराष्ट्र उपचारात अव्वल
देशात महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्र पहिल्या तर केरळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांत 6559 रुग्ण बरे झाले आहेत.
देशनिहाय रुग्णांची संख्या अशी (आकडेवारी टक्क्यांमध्ये)
अमेरिका 40.8
फ्रांस 15.5
ब्रिटन 04.5
ब्राझील 3.6
बेल्जीयम 3.2
भारत 0.7
देशनिहाय नवीन बाधितांची संख्या अशी
अमेरिका 59,515
ब्राझील 52,885
फ्रांस 19,659
इटली 17,437
भारत 15,435