सटाणा – तालुक्यातील बुंधाटे व डांगसौंदाणे गावात तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय दोन्ही ग्रामपंचायतींनी घेतला आहे. २२ ते २४ मार्च या कालावधीत सर्व व्यवहार बंद राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. जनता कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ज्या व्यक्ती विना मास्क आढळून येतील त्यांना दोनशे रुपये दंड केला जाणार आहे. जनता कर्फ्यूचे कसोशीने पालन करुन कोरोनाची साखळी तोडू या, असे आवाहन ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने केले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!