नाशिक – नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे कोरोना बाधित झाले आहेत. त्यांनी दोन दिवसापूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. गेल्या काही दिवसापासून सर्वत्र शासकीय अधिका-यांना कोरोना लस दिली जात आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारही गंभीर झाले आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. आयुक्त गमे यांनी लसीचा पहिलाच डोस घेतला आहे. त्यातच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतरही त्यांना बाधा झाल्याचा एकमेकाशी संबंध नसल्याचे सांगितले जात आहे. लस सुरक्षित आहे. दरम्यान, गमे यांच्यावर उपचार सुरू झाले असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे.