नवी दिल्ली – भारतात ई-कॉमर्स क्षेत्रात यंदाच्या फेस्टिव्हल सिझनमध्ये बंपर खरेदी-विक्री झाली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मंदी असल्याच्या वार्ता केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट होत आहे. १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत तब्बल ८.३ अब्ज डॉलरची उलाढाल ई कॉमर्स मध्ये झाली आहे. सर्व ई-कॉमर्स कंपनींच्या ऑनलाइन फेस्टिव्हल सेलमध्ये फ्लिपकार्टने इतर सर्व कंपनींना मागे टाकले आहे.
ई-कॉमर्स क्षेत्रातील प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले की, गेल्या काही वर्षांच्या कालावधीपेक्षा यंदा ६५ टक्क्यांपेक्षा अधिक विक्री झाली आहे. तसेच रेडसीरच्या अहवालात म्हटले आहे की, सात वर्षांपूर्वी केवळ सात अब्ज डॉलर्सच्या विक्रीचा अंदाज होता, मात्र त्यावेळी वास्तविक विक्री जास्त राहिली होती. तर यावर्षी सप्टेंबरमध्ये एकूण विक्री ३.२ अब्ज डॉलर (२२ हजार कोटी रुपये) झाली आहे. या हंगामात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट ग्रुप हे एकूण विक्रीत ८८ टक्के पेक्षा अधिक भागधारक आहेत. या कंपन्यांमधील फ्लिपकार्टच्या उत्पादनांना अधिक पसंती मिळली. कारण कोविड -१९ लॉक डाऊनमध्ये अनेक ग्राहकांनी ऑनलाईन खरेदीला स्थान दिले. त्यामुळे ऑफलाइन खरेदी जास्त होऊ शकली नाही. त्याचा फायदा ई कॉमर्स क्षेत्राला झाला आहे.