कोची – येथे नियमित उड्डाण करतेवेळी रविवारी सकाळी सरावादरम्यान ग्लायडरला अपघात झाला. भारतीय नौदलाचे प्रशिक्षण सुरु असतांना हा अपघात झाल्याचे नौदलाने स्पष्ट केले आहे. नियमित प्रशिक्षणाच्या वेळी आयएनएस गरुड या ग्लायडरने उड्डाण घेतले होते. सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाल्याचे नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ग्लायडरने उड्डाण घेतल्यानंतर काही अंतराने जवळच असलेल्या थोप्पुमपाडी पुलाजवळ ग्लायडरला अपघात झाला. ग्लायडरमधील लेफ्टिनंट राजीव झा आणि पेटी ऑफिसर सुनील कुमार यांना तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाल्याचे नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासंबंधी दक्षिणी नौदल कमांड यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहे.